जयपूर : जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमला गुरुवारी बॉम्ब स्फोटाची धमकी मिळाली. राजस्तान राज्य क्रीडा परिषदेच्या ईमेलवर ही धमकी देण्यात आली. धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांनी शोध मोहीम सुरू केली आहे. क्रीडा परिषदेचे अध्यक्ष नीरज पवन म्हणाले, गुरूवारी सकाळी परिषदेच्या मेलवर एक संदेश आला, ज्यामध्ये स्टेडियमवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला याची माहिती देण्यात आली. पोलिसांसोबतच बॉम्ब शोध पथके घटनास्थळी दाखल झाली. मात्र, त्यांना अद्याप कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. स्टेडियमच्या बाहेरील परिसर आणि इमारतीची तपासणी केली जात आहे.
Fans
Followers